fbpx

ज्यांना समाजाने डावलले, शेवटी पूरग्रस्तांच्या मदतीला त्याच वेश्या धावल्या

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना आर्थिक मदतीची गरज आहे. सरकारही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

या पूरग्रस्तांच्या मदतीला आता मुंबईतील कामाठीपुरा येथील वेश्या धावल्या आहेत. त्यांनी ‘सिस्टर्स ऑफ कामाठीपुरा’ या संस्थेमार्फत मदतनिधी दिला आहे. याबाबत, वेश्या आणि तत्सम पीडितांचे दु:ख मांडणाऱ्या, वेश्या महिलांसाठी समाजकार्य करणाऱ्या समीर गायकवाड यांनी फेसबुक ही माहिती दिली आहे.

समीर गायकवाड यांनी ‘मदतीची भावना सगळ्यांची असते अगदी त्यांचीसुद्धा असते ज्यांचं आयुष्यभर शोषण झालेलं असतं. एक छोटीशी मदत समाजाने झिडकारलेल्या वेश्यांकडून. सेक्सवर्कर्स भगिनींचा निधी किती रकमेचा आहे हे गौण आहे, त्यांच्या भावना मानवतेच्या अत्युच्च पातळीच्या आहेत हे मात्र नक्की अशी पोस्ट गायकवाड यांनी केली आहे.

 

दरम्यान, राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांना ५ कोटी रुपये मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘माझ्या निधीतून ५ कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे’ अशी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या