‘त्या’ कर्मचाऱ्यांची पदोन्नती रद्द, तुकाराम मुंढेचा ‘दणका

टीम महाराष्ट्र देशा – ‘पूर्वीच्या पीएमपी प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाला पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी आणखी एक दणका दिला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) निर्मितीचा प्रशासकीय आराखडा अंतिम झालेला नसताना काही कर्मचाऱ्यांना हंगामी बढती देऊन कायम करण्यात आले होते. त्या पीएमपीच्या १० कर्मचाऱ्यांच्या बढत्या रद्द करून त्यांना मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत.

सन २००७ मध्ये पीएमपी व पीसीएमटीचे एकत्रीकरण करण्यात आल्यानंतर नवीन पद निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी पीएमपीच्या सुमारे १८ कर्मचाऱ्यांची विविध पदावर हंगामी स्वरुपात बढती करण्यात आली होती. परंतु, यानंतरही प्रशासकीय आराखडा अंतिम झाला नव्हता. तरीही संबधित कर्मचाऱ्यांना त्याच पदावर सुधारित वेतनश्रेणीसह कायम करण्यात आले होते. ही बाब राष्ट्रवादी कामगार युनियनने लक्षात आणून दिल्यानंतर मुंढे यांनी तपासणी करून अखेर १८ पैकी १० कर्मचाऱ्यांची पदोन्नती रद्द केली आहे. त्यांना मुळ पदावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. पुर्वी बढती देण्यात आलेल्या पदाच्या वेतनश्रेणीऐवजी त्यांना नवीन पदाची वेतनश्रेणी दिली जाणार आहे

You might also like
Comments
Loading...