दूध भुकटी प्रकल्पधारकांना मिळणार प्रतिलिटर 3 रुपये अनुदान

मुंबई : दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी उत्पादित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय  मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली. या निर्णयामुळे दूध उत्पादकांच्या दुधाला निश्चितपणे योग्य दर मिळेल, असा विश्वास  जानकर यांनी व्यक्त केला आहे.

जानकर पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचे उत्पादन झालेले आहे. याच काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे दरही घसरलेले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरलेल्या दूध भुकटीच्या दरामुळे दूध भुकटी प्रकल्पधारकांचा कल कमी दूध भुकटी तयार करण्याकडे असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत दूध भुकटी प्रकल्पधारक दूध भुकटी निर्मितीकरिता शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करतात. याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होतो.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

मार्च 2018 अखेर रोजी 26 हजार 506.70 मेट्रिक टन इतका दूध भुकटी साठा शिल्लक आहे. या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होऊ नये यासाठी दूध भुकटी प्रकल्पधारकांना अधिक दूध भुकटी उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यानुसार शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मार्च 2018 मध्ये उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान 20 टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन करणाऱ्या सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी बनविण्याकरिता वापरलेल्या दुधासाठी प्रति लिटर 3 रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्यास मान्यता देण्याचा आल्याचं जाणकर  यांनी म्हंटले.

Shivjal