मातब्बर आमदाराच्या मुलाच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने दिले हे आदेश

ncp9_

बार्शी:- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी शेतकरी श्रीहरी शिंदे यांच्या नावावर परस्पर कर्ज काढल्याचा आरोप झाला आहे. रणजितसिंह शिंदे हे बबनराव साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी श्रीहरी शिंदे यांच्या नावाने कागदपत्रे तयार करून बँक ऑफ इंडिया मध्ये खाते उघडले होते. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर श्रीहरी शिंदे यांच्या नावे ३ लाख ९३ हजार रूपयांचे कर्ज मंजूर झाले होते. त्यानतंर मंजूर झालेली रक्कम परस्पर रणजितसिंह शिंदे यांच्या नावावर वर्ग करण्यात आल्याचा आरोप रणजितसिंह यांच्यावर केला आहे. या कर्जाबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचे श्रीहरी शिंदे यांचे म्हणणे आहे.

रणजितसिंह शिंदे यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम वर्ग झाल्याची कल्पना शेतकरी श्रीहरी शिंदे यांना नव्हती. मात्र, कर्जाची रक्कम व्याजासह परत करण्याची नोटीस श्रीहरी शिंदे यांना आल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार समजला असल्याचा दावा श्रीहरी यांनी केला आहे. कर्जाची व्याजासह रक्कम ३ लाख ९३ हजार २०२ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

बार्शी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे, बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज कारखान्याचे कार्यकारी संचालक, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आणि अन्य एकाजणावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार बबनराव शिंदे काय भूमिका घेतील हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या