पंतप्रधानांनी ओबीसींना द्यावे हक्काचे घर, कोणी केली मागणी जरूर वाचा

narendra modi

चिमूर : गरीब लोकांना घर मिळावे यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाचीही आदिवासी लोकांसाठी ‘शबरी आदिवासी घरकुल योजना’ आहे. अनुसुचित जाती, जमातीसाठी ‘रमाई आवास योजना’ सुरू करण्यात आली असून नुकतीच शासनाने धनगर समाजासाठी ‘अहिल्याबाई होळकर घरकुल योजना’ सुरू केली आहे. मात्र ज्या ओबीसीत ३६० जातींचा समावेश आहे त्यांच्यासाठी मात्र राज्यात एकही घरकुल योजना नाही.

महाराष्ट्रातील ओबीसींमध्ये काही घटक असा आहे की, जे हालाकिच्या परिस्थितीत जीवन जगतात. त्यांचे कुटुंबे उघड्यावर आहे. अशा ओबीसी बांधवांसाठी किमान आत्तातरी केंद्र शासनाने ‘छत्रपती राजषी शाहू महाराज घरकुल योजना सुरू करणे अपेक्षित असल्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी – अधिकारी महासंघाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

छत्रपती राजषी शाहू महाराज यांचे शैक्षणिक, सामाजिक, कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजाला योग्य दिशा मिळाली. समाजाची उन्नती झाली. अशा थोर महापुरुषांच्या नावाने घरकुल योजना सुरू करण्यात यावी अशा मागणीचे पत्र चिमुरकरांच्या स्वाक्षरीने पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर केली टीका; म्हणाले, “मी कृषिमंत्री असताना…”

नाराजीचे कारण ठरलेल्या ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत काँग्रेसला मिळाले स्थान; या नेत्याचे झळकले फोटो

‘दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली’

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेल्या १ कोटी मधला एकही रुपया अजून आला नाही!