पंतप्रधान पद दुसऱ्या पक्षाला गेल तरी चालेल पण मोदींना हरवणार : कॉंग्रेस

narendra modi sad

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्यात येताच कॉंग्रेसने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. काहीही झाले तरी मोदींना सत्ता स्थापन करून देणार नसल्याचा चंग कॉंग्रेस नेत्यांनी बांधला आहे. अशाप्रकारची भूमिका कॉंग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी देखील व्यक्त केली आहे. निवडणुकीत कॉंग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर पुढील सरकारचे नेतृत्व काँग्रेस करेल. मात्र युपीएच्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसच्या बाजूने सहमती नसेल तर दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान असेल अशी भूमिका काँग्रेसने स्पष्ट केली आहे.

कॉंग्रेसकडून युपीएची सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत निकालानंतरची रणनीती ठरवण्यात आली. तसेच कॉंग्रेसच्या बाजूने निकाल असेल तर सरकारचे नेतृत्व काँग्रेस करेल. मात्र जर युपीएमधील पक्षांची काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत सहमती नसेल तर दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान असेल असे निश्चित करण्यात आल आहे. पण काहीही झाल तरी एनडीएचा पंतप्रधान होऊ देयचा नाही असे या बैठकीत अंतिम करण्यात आल आहे.

दरम्यान यंदाच्या निवडणुकीत भाजप पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न कॉंग्रेस आणि मित्रपक्षांकडून होत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालापूर्वीच कॉंग्रेसने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून भाजपाला 73 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाला 10 ते 15 जागा मिळू शकतात. त्यामुळे भाजपा खासदारांची संख्या कमी होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे एनडीएविरोधातील पक्ष एकत्र येऊन भाजपाविरोधात सत्ता स्थापन होऊ शकते असा अंदाज लावत कॉंग्रेस सत्ता सथापन करण्याचा प्रयत्न करत आहे.Loading…
Loading...