fbpx

देशाचा पंतप्रधान शिवसेनाचं ठरवणार – खा.संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने सर्व खासदारांची सकाळी 11 वाजता मातोश्रीवर बैठक बोलवली होती. या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये भाजप बरोबर युती होणार का या बाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आजच्या बैठकी नंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राऊतांनी बैठकी मध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात गणितं आणि समीकरणांची जुळवा जुळव होत असल्याच सांगितल.

मातोश्री वर झालेल्या खासदारांच्या या बैठकीत जदयुचे नेते आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हेही उपस्थित होते. प्रशांत किशोर यांच्या उपस्थिती बाबत बोलताना राऊत म्हणाले की, ते केवळ सदिच्छा भेटीला आले होते. तसेच राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या प्रचाराची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहे. तसेच पहिल्यापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेची भूमिका ही थोरल्या भावासारखी आहे. दरम्यान महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा शिवसेनेचाचं असणार आहे तर देशाचा पंतप्रधान देखील शिवसेनाच ठरवणार असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.