पंतप्रधानपद घोषणा करून मिळत नसते; फडणवीसांची राहुल गांधींवर टीका

मुंबई – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यास २०१९ मध्ये मी पंतप्रधान होऊ शकतो, असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं. दरम्यान राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून टीकेची झोड उठवण्यात आली.

पंतप्रधानपद घोषणा करून मिळत नसते, त्यासाठी लोकांनी निवडून द्यावे लागते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यास २०१९ मध्ये मी पंतप्रधान होऊ शकतो, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांकडून देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा फडणवीस यांनी म्हटले की, पंतप्रधान व्हायला आवडेल, हे राहुल गांधींनी स्वत: बोलून काय फायदा आहे. त्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिले पाहिजे अशी टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

You might also like
Comments
Loading...