‘पंतप्रधानांनी ‘थाळ्या वाजवा कोरोना पळवा’ संदेश दिला होता पण..’,’शिवसेने’चा मोदींवर निशाना

‘पंतप्रधानांनी ‘थाळ्या वाजवा कोरोना पळवा’ संदेश दिला होता पण..’,’शिवसेने’चा मोदींवर निशाना

sanjay raut- modi

मुंबई: देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटत आहे. तसेच सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आता त्यातच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आपल्या प्रिय पंतप्रधानांनी ‘थाळ्या वाजवा कोरोना पळवा’ असा दिव्य संदेश दिलाच होता. पण थाळ्या वाजवून उपयोग झाला नाही व कोरोनामुळे जशा जागोजाग चिता पेटल्या तशी गंगेच्या प्रवाहातही शेकडो प्रेतांना जलसमाधी देण्यात आली. त्यामुळे थाळ्या आणि घंटा यापेक्षा विज्ञान, वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर लोकांचे प्राण वाचवत असते. असे म्हणत सामनातून मोदींवर टीका करण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात जम्बो कोविड सेंटर्स, प्राणवायूचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, कडक निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग याबाबत ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला व आज दिवाळीच्या तोंडावर लॉकडाऊनचे टाळे उघडता आले. निर्बंध उठलेच आहेत. तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने, नियम-कायद्यांचे पालन करून मुंबई-महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या. जगा आणि जगू द्या. उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका. असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केले आहे.

महत्वाच्या बातम्या