मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस उद्यापासून सुरुवात

drama image

टीम महाराष्ट्र देशा – :महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सत्तावन्नाव्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी उद्यापासून (दि. ६ नोव्हेंबर) रत्नागिरीत सुरू होणार आहे. स्वा. सावरकर नाट्यगृहात उद्या सायंकाळी सात वाजता अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष व आमदार उदय सामंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या वेळी नगराध्यक्ष राहुल पंडित, ज्येष्ठ रंगकर्मी लहू घाणेकर उपस्थित राहणार आहेत.रत्नागिरीत आजपासून राज्य नाट्य स्पर्धा राज्यातील वेगवेगळ्या १९ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे.

प्रत्येक केंद्रावरून एक याप्रमाणे अंतिम फेरीसाठी १९ नाटके निवडली जाणार आहेत. राज्य नाट्य स्पर्धांना रत्नागिरीत केंद्र झाल्यापासून रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी १५ नाटकांचा सहभाग होता. यावर्षी स्पर्धेत १९ नाटके सादर केली जाणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १२, तर सिंधुदुर्गातील सात नाटकांचा समावेश आहे. रसिकांसाठी अल्प दरातील १० आणि १५ रुपयांची तिकिटे असून तिकीट विक्री सायंकाळी ५ वाजता सावरकर नाट्यगृहात होईल. उद्घाटनाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.Loading…
Loading...