रॉयल एनफिल्डच्या ‘ या ‘ बाईकची किंमत वाढली

रॉयल एनफिल्ड

मुंबई : रोज नव्या बाईक्स बाजारात येत असल्या तरीही रॉयल एनफिल्डची क्रेझ मात्र तसूभरही कमी झालेली नाही. श्रीमंत असल्याचं प्रतिक म्हणून आजही रॉयल एनफिल्डकडे पाहिलं जात. मात्र सामान्य ग्राहकांना इच्छा असून देखील केवळ किंमत जास्त असल्यामुळे हि गाडी घेता येत नाही.

त्याचबरोबर तरुणाई मध्ये आणि बाईक रायडर्स यांच्या कडून विशेष पसंती असलेल्या अनेक बाईक्स बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये रॉयल एनफिल्ड ही कंपनी आता भारतात एक लोकप्रिय बँड बनला आहे. भारतीय ग्राहक या कंपनीच्या बाईक्सची आतुरतेने वाट पाहात असतात.

मात्र आता नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच वाहन निर्माता कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. अशात आता रॉयल एनफिल्डनेही आपल्या बेस्ट सेलिंग बाईक क्लासिक 350 च्या किंमतीत वाढ केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बाईकच्या सर्व वेरिएंट्सवर वेग-वेगळ्या रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

या बाईकची किंमत 5231 रुपयांपासून 5992 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये क्लासिक 350 च्या एन्ट्री लेवल मॉडेल स्डँडर्ड वेरिएंटची किंमत आधी 1,67,235 रुपये इतकी होती. ती वाढवून आता 1,72,446 रुपये इतकी झाली आहे. त्यानंतर आता कंपनी क्लासिक 350 च्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलला लवकरच बाजारात सादर करणार आहे. कंपनीने या बाईकच्या किंमतीतील वाढीसह, दूसरे कोणतेही बदल केलेले नाहीत.

महत्वाच्या बातम्या