सध्याचे सरकार हे जुमलेबाज सरकार – सुप्रिया सुळे

कर्जमाफी हे सरकारचं सर्वात मोठ अपयश-सुळे

पुणे- जाहिरातींवर खर्च करणारे आणि सत्यापासून दूर असलेलं सध्याचे सरकार हे जुमलेबाज सरकार असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी आज पुणे महानगरपालिकेला भेट दिली यावेळी त्या बोलत होत्या.
आज देवेंद्र फडणवीस सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष झाली यानिमित्त सरकारच्या कामगिरीबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे. सरकारच्या कामगिरीबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.कर्जमाफी हे सरकारचं सर्वात मोठ अपयश असल्याची टीका करताना कुपोषण,आरोग्य ,बेरोजगारी या सर्वच क्षेत्रात सरकार अपयशी ठरल्याचं मत व्यक्त केलं.याशिवाय स्मार्ट सीटी हा चांगला कार्यक्रम आहे मात्र मागील तीन वर्षात काय झालं,किती निधी आला याचा अभ्यास होणे गरजेचे असून मागील तीन वर्षात सरकारने सुरु केलेल्या योजनांची काय स्थिती आहे हे देखील जनतेसमोर यायला हवे अशी देखील मागणी सुळे यांनी केली

You might also like
Comments
Loading...