fbpx

काँग्रेसला खिंडार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

bjp and congress

मुबंई – अकलूज जि.सोलापूर येथील महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष अॅड.महामूद गुलाब तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ओबीसी सेलच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुबंई येथे प्रवेश केला यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख , सोलापूर जिल्हा भाजप अध्यक्ष शहाजी पवार, कार्यकारणी सदस्य राजकुमार पाटील हे उपस्थित होते.

प्रवेश करता वेळेस अॅड.एम.जी. तांबोळी यांनी काँग्रेसवर जोरदार टिका करत काँग्रेस मध्ये निष्ठावंताना कायम डावल जात आहे राज्यातील काँग्रेस नेतृत्वाने ने आजपर्यंत ओबीसी समाजाच्या हिताच्या दृष्टीने कोणतेच काम केलेले नाही असे सांगितले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या बाबत हिताच्या दृष्टीने काम केलेले आहे योग्य निर्णय घेतलेले आहेत भाजप सरकारच्या सर्वसमावेशक भूमिके मुळे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच्यावच्या विश्वासामुळेच आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहोत असे सांगितले.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुभाष देशमुख यांनी नरेंद्र मोदी यांच्या "सबका साथ सबका विकास" या धोरणा नूसार भाजप सरकार अल्पसंख्याक व ओबीसी समाजाच्या हिताच्या दृष्टीने काम करत आहे कायम त्याच्या विकासा साठी व उन्नतीसाठी प्रयत्नशील राहिल असे सांगितले.

लोकसभेला सोलापूर मध्ये झालेला सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव व यातच काँग्रेसच्या या बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.