आयपीएलमधील ‘या’ धाकड फलंदाजाचा विलगीकरणातही सराव; व्हिडीओ होतोयं व्हायरल

haidrabad

नवी दिल्ली : आयपीएल 2021 चा दुसरा भाग यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू दुबईला रवाना झाले आहेत. तर काही खेळाडू आधीच दुबईमध्ये पोहचले होते. तसेच आयपीएलच्या या भव्य स्पर्धेसाठी सर्वच खेळाडू जोरदार तयारी करताना दिसत आहेत.

दुबईमध्ये जरी खेळाडू पोहचले असतील तरी देखील आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय त्यांना मैदानावर सराव कारण्याची  करता येणार नाही. कोरोनाचं संकट अजूनही कायम असल्यामुळे कोरोनासंबधी सर्व नियम पाळले जात आहेत. अशावेळी खेळाडू विलगीकरणाचे नियम पाळूनच सरावाला सुरुवात करत आहेत. तर काही खेळाडूंनी हॉटेल रुममध्येच फलंदाजीचा सराव सुरु केला आहे.

यातच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर  याने आपल्या हॉटेल रुममध्येच सराव सुरु केला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सनराजर्स हैद्राबाद संघातून खेळणारा वॉर्नर हा कायमच त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. यावेळीही त्याचा हॉटेल रुममध्ये फलंदाजीचा aसराव करतानाचा व्हि़डीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सनराजर्स हैद्राबादने त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी ‘विलगीकरण असो वा नसो सराव गरजेचाच आहे.’ असं कॅप्शनही दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :