राजकीय नेते-कार्यकर्त्यांकडून पोलिसांना फोन करून दम देण्याची प्रथा आता वाढली आहे- जयंत पाटील

राजकीय नेते-कार्यकर्त्यांकडून पोलिसांना फोन करून दम देण्याची प्रथा आता वाढली आहे- जयंत पाटील

jayant patil

सांगली : सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना मागील काही वर्षांपासून राज्यात राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्याकडून पोलिसांना दमबाजी करण्याचे, बदलीची धमकी देण्याचे प्रकार वाढले असल्याचे पाटील म्हणाले आहेत.

यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की,’पोलिसांना फोन करून दम देण्याची प्रथा आता वाढली आहे. ‘हे करा, ते करा, बघतोच तुम्हाला, इकडं घालवतो, तिकडे घालवतो’ असं बोललं जातं. त्यांना नोकरीच करायची असते, पण ही लोकं काम करत असतात. मागेच पोलिसांनी चोरांचा पाठलाग करून सोनं, दागिणे हस्तगत केलेले नागरिकांना माझ्याच हस्ते परत दिलेत. ही खरी सेवा असते. ज्याचं सोनं चोरी जातं त्याचं सर्वस्व जातं, त्यामुळे हे सोनं परत मिळाल्यावर हे नागरिक पोलिसांना खूप आशीर्वाद देत असतील, याची मला खात्री आहे,’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आपण पोलिसांना जितकं संरक्षण देऊ तेवढं पोलीस धाडसानं काम करतात. अनेकदा राज्यकर्त्यांचे समजगैरसमज होतात. मग राज्यकर्त्यांचा पहिला प्राधान्यक्रम पोलीस अधिकाऱ्याला बदलण्याला देतात. बदली करणं हा उपाय नसतो. खरच त्याची चूक असेल तर सुधारणेसाठी त्याला संधी दिली पाहिजे.’

महत्वाच्या बातम्या