छिंदमची उपमहापौर पदावरून हकालपट्टी मात्र भाजपमधील पद कायमच

भाजपच्या दक्षिण भारतीय आघाडीच्या संघटन सरचिटणीसपदी चार महिन्यांपूर्वी झाली होती छिंदमची नियुक्ती

अहमदनगर: शिवरायांबद्दल अपशब्द काढणारा निलंबित श्रीपाद छिंदम याची महापौरपदावरून व नगर भाजपमधून जरी हकालपट्टी झाली असली. तरी त्याच भाजप मधील अस्तित्व अजूनही कायम असल्याची माहिती मिळत आहे.
छिंदम ची प्रदेश भाजपच्या दक्षिण भारतीय आघाडीच्या संघटन सरचिटणीसपदी चार महिन्यांपूर्वी छिंदमची नियुक्ती झालेली आहे. भारतीय आघाडीने मात्र अजूनही छिंदम विरोधात कोणतीही कारवाई केली नाही.

श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महापालिकेचे निलंबित उपमहापौर आहे. छिंदमने त्याच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्याची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला होता. त्यानंतर छिंदम ची महापौर पदावरून वर नगर भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. त्याला पोलिसांनी अटक करून नाशिक कारागृह हलवले आहे.

एकीकडे शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे राजकारणी लोकांनी छिंदमवर टीकेची झोळ उठवली आहे. मात्र छिंदमच राजकीय अस्तित्व अजूनही कायम असल्याने भाजपवर टीका होत आहे. महाराष्ट्रात दक्षिण भारतीय नागरिकांचे संघटन करताना त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रदेश भाजपने दक्षिण भारत आघाडी सुरू केली आहे. मागील नोव्हेंबर २०१७ मध्ये मुंबईत झालेल्या कार्यक्रमात छिंदमची या आघाडीच्या प्रदेश संघटन सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते त्याला नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते. त्यामुळे छिंदमची प्रदेश संघटन सरचिटणीसपदी नियुक्ती अजूनही कायम असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

You might also like
Comments
Loading...