fbpx

विश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता

नवी दिल्ली – पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढता आलेला नाही.शिवसेनेसह इतर हिंदुत्ववादी संघटना आता उघडपणे भाजपविरोधी भूमिका घेऊ लागल्या आहे. भाजपाने राम मंदिराबाबत घेतलेल्या दुटप्पी भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये रोष वाढू लागला आहे. हिंदुत्ववादी संघटनांमध्ये भाजपविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले असून विश्व हिंदू परिषदेने या मुद्द्यावरून काँग्रेसला दिलेली ऑफर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान राम मंदिराच्या प्रश्नावर सुरुवातीपासून पुढाकार घेणाऱ्या विश्व हिंदू परिषदेने काँग्रेसला मोठी ऑफर दिली आहे. तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशी ऑफर विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान,शिवसेनेने देखील याच मुद्यावरून भाजपविरोधात उघड भूमिका घेतली असून ‘हर हिंदू कि यही पुकार,पहले मंदिर फिर सरकार’ असा नारा दिला आहे. शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे इतर हिंदुत्ववादी संघटनांना एक दिशा मिळाली असून भाजपवर दबाव टाकण्याचा जोरदार प्रयत्न आता या संघटना करू लागल्या आहेत.

नेमकं काय म्हटलंय विश्व हिंदू परिषदेने ?

”राम मंदिरासाठी ज्यांनी खुलेपणाने आश्वासन दिले आहे, त्यांना पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला तर आम्ही काँग्रेला पाठिंबा देण्याबाबतही विचार करू. त्यांनी आरएसएच्या स्वयंसेवकांच्या काँग्रेस प्रवेशावर घातलेली बंदी मागे घ्यावी. केवळ जानवे परिधान करून हे होणारे नाही.” – आलोक कुमारा (विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष)