विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

vidhanbhavan-

मुंबई : राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपाकडून महादेव जानकर, भाई गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश नारायण पाटील व नीलय नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक बिनविरोध झाल्यास भाजपाच्या पाच, शिवसेनेच्या दोन, काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून येईल. 11वी जागा ही शेकापचे जयंत पाटील लढतील आणि सर्वपक्षीय संबंधांचा फायदा घेत तेही बिनविरोध निवडून येतील, असे मानले जात आहे.काँग्रेसने शरद रणपिसे आणि मिर्झा वजाहत अख्तर यांना तर राष्ट्रवादीने बाबा जानी दुर्रानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेना झटका ! रमेश कराड यांचा उमदेवारी अर्ज मागे

नाशिकमध्ये सेनेला लॉटरी : भाजप,राष्ट्रवादी,काँग्रेस,मनसे,जनता दलाला धक्का, नरेंद्र दराडे विजयी

माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली