निरा-भिमा पट्ट्यात पेट्रोल-डिझेलचे साठे असण्याची शक्यता

पुणे  : इंदापूर तालुक्यात भूगर्भात पेट्रोल, डिझेल तसेच गॅसचे साठे असण्याची शक्यता गृहीत धरुन बोअरवेलद्वारे चाचण्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे निरा भिमा पट्ट्यातील नागरिकांमध्ये द्रव्य खनिजाच्या उपलब्धतेबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.

bagdure

इंदापूर तालुक्यातील बावडा, शेटफळ हवेली, राजवडी, आगोती, वकीलवस्ती, वडापुरी, तरंगवाडी, वनगळी, करेवाडी येथील वाड्या-वस्त्यांवर जमिनीत बोअरवेल घेऊन चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे. यासाठी बोअरवेल घेणाऱ्या दहा मशीन तसेच ट्रॅक्टरच्या वहानांचा ताफा कार्यरत आहे. देशातील गाळयुक्त खो-यात हायड्रोकार्बनचे साठे असण्याची शक्यता तपासण्यासाठी टू डी सेस्मिक डेटा संकलित करण्याचे काम इंदापुरात सध्या जोरात सुरू असून प्रत्यक्षात भूगर्भात पेट्रोल, डिझेल तसेच गॅसचे साठे शोधण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने सॅटेलाईटद्वारे राज्यातील सर्वेक्षणाची स्थाने तसेच या ठिकाणचे अक्षांश व रेखांशांच्या मदतीने द्रव्यखनिज साठे शोधण्यास सुरुवात केली आहे. जीपीएसच्या मशीनने ही स्थाने मार्क करुन या ठिकाणी साडेचार इंचाचे बोअरवेल घेऊन त्यात पाणी भरून एक छोटासा ब्लास्ट केला जातो.

यातून निर्माण होणार्‍या लहरी एका मशीनमध्ये संकलित करून याचा अहवाल भारत सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी किती प्रमाणात गॅस किंवा पेट्रोलियम पदार्थ आहेत हे समजणार आहे. याची चाचणी घेण्याचे काम इंदापूर तालुक्यात सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

You might also like
Comments
Loading...