सिद्धेश्वर मंदिर समितीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला खुलासा

सोलापूर: सिद्धेश्वर मंदिर परिसरातील तलावाच्या तोडफोड प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी मंदिर समितीला खुलासा मागितला आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने दिलेल्या निधीतून मंदिर परिसर तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले होते, या ठिकाणी काही बदल वा दुरुस्ती करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे अपेक्षित असताना मंदिर समितीने विनापरवानगी तलाव परिसरातील कृत्रिम तलाव इतर ठिकाणी तोडफोड केली आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने खुलासा मागितला आहे.

जिल्हाधिकारी हे तलाव सुधारणा समितीचे अध्यक्ष असून त्यांच्या देखरेखीखाली मंदिर परिसर तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाकडून प्राप्त निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्वतः पाहणी केली. खुलासा मिळताच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. वसतिगृह लवकरच सेवेत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन येथे बांधलेले वसतिगृह सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. यामध्ये वसतिगृहासाठी लागणारा कर्मचारी वर्ग, रेक्टर यांची पदे भरली जातील. येत्या शैक्षणिक वर्षापासून या वसतिगृहाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल, असे नियोजन करण्यात येईल.