औशातील राजकारण रंगणार! माजी मंत्री बसवराज पाटील पुन्हा सक्रिय

लातूर: मागच्या विधानसभा निवडणुकीत हारल्यामुळे माजी मंत्री बसवराज पाटील यांनी औसा मंतदारसंघांकडे दुर्लक्ष केले आणि त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे त्यांनी लोकांपासून दूर राहणेच पसंत केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाटील यांनी औसा मंतदारससंघात जहेरी लावायला सुरुवात केली आहे. आगामी औसा पालिकेची निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करीत दुरदृष्टी पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे.

मागील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नाराज असलेल्या स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. एकीकडे कॉंग्रेस बळकट करण्याबरोबरच राष्ट्रवादी या मित्र पक्षाशी वैचारिक संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी चालविलेले प्रयत्न औशाच्या राजकारणाला सकारात्मक मार्गावर घेऊन जाण्यासाठी पोषक असल्याचे बोलले जात आहे. औसा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास असलेल्या माजी मंत्री बसवराज पाटलांना तिसऱ्यांदा पुन्हा विजय मिळवता आला नव्हता. त्यांच्या सोबत असणारे सुनिल मिटकरी हे गेल्या नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी नाट्यानंतर त्यांच्यापासून दुर होत त्यांच्या विरोधात गेले होते. बसवराज पाटलांच्या पराभवाला जरी अनेक कारणे असली तरी मिटकरींची नाराजीही प्रमुख असल्याचे बोलले जाते. तर आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादीच्या डॉ.अफसर शेख यांच्याशीही याच नगरपालिका निवडणुकीत त्यांचे बिनसले होते.

या सर्व झालेल्या पूर्व घटना आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेली नाराजी दुर करण्यासाठी पाटील यांनी त्यांना परत आपल्या कक्षेत आणले असुन राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनाही त्यांनी जवळ घेत आघाडीचा धर्म पाळला आहे. आगामी नगरपालिका निवडणुक ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना या आघाडीच्या फॉर्म्युल्यावरच करण्यावर व अफसर शेख यांना समोर ठेऊनच करण्याचे धोरण त्यांनी राबविल्याने सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सध्या बसवराज पाटील करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP