निनावी ‘लेटर बॉम्ब’ने राजकीय वातावरण तापले . . .

पुणे : “आमचे पदाधिकारी बावळट आहेत’ या खा.संजय काकडे यांच्या विधानावरून सुरू झालेला वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. आता या प्रकरणाने वेगळं वळणं घेतलं असून भारतीय जनता पक्षाच्या पुणे शाखेवर निनावी लेटरचा बॉम्ब पडला आहे. हे निनावी पत्र भाजपच्याच नव्हे तर, चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्याही घरपोच पाठविण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

वाचा नक्की काय आहे पत्रात 


तब्बल चार पानांचे हे पत्र अनेक नगरसेवकांना घरी टपालाने पाठविण्यात आले आहे. हे पत्र खासदार काकडे यांच्या समर्थकांनीच पाठविले आहे, असे त्यातून भासवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

वाचा नक्की काय आहे पत्रात 

या पत्रात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, योगेश टिळेकर, योगेश मुळीक, प्रा. मेधा कुलकर्णी, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत, स्वीकृत नगरसेवक गोपाळ चिंतल, गणेश बिडकर यांच्याबद्दल शेरेबाजी करण्यात आली आहे. या पैकी अनेक नेते केवळ काकडे यांच्यामदतीमुळेच निवडून आल्याचे म्हटले आहे.

वाचा नक्की काय आहे पत्रात

तर, राजेंद्र शिळीमकर, सुनील कांबळे यांना डावलण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. भाजपचे कार्यालय कसबा पेठ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्यातील शनिवार पेठेतील मुख्यालयाबाबतही यामध्ये टिपण्णी करण्यात आली आहे. पक्षात काही घटकांना बाजूला कसे ठेवले जात आहे, याचेही वर्णन त्यात आहे.

वाचा नक्की काय आहे पत्रात


भाजपच्या शहराच्या नेत्यांबद्दल सरसकट शेरेबाजी करीत असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनाही त्यात लक्ष्य करण्यात आले आहे.

वाचा नक्की काय आहे पत्रात

पक्षातीलच असंतुष्ट घटकांनी हा उद्योग केला आहे की विरोधी पक्षांतील कोणत्या तरी सदस्याचा यात हात आहे हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी या पत्रामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे मात्र, “”या पत्राचा माझा किंवा माझ्या कार्यकर्त्यांचा दुरान्वयेही संबंध नाही,” असे खासदार काकडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या बाबत पोलिसांकडे तक्रार करण्याचीही कार्यकर्त्यांना सूचना केली आहे.