मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ४ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला असून जर मशिदींवरील भोंगे उतरले नाही तर मनसेकडूनही मशिंदींसमोर हनुमान चालिसा लावण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), राज्याचे पोलीस महानिरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. तसेच या बैठकीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी प्रसंगी कठोर पावले उचला, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाणार आहे. तसेच या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा घेण्यात आला असून इतरही काही मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
दरम्यान, औरंगाबाद सभेत मशिंदीच्या भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला. त्याही आधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २ एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ‘कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट आवाजात स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार,’ असा इशारा दिला होता.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 KKR vs RR : राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्यांदा पराभूत; संजू सॅमसननं ‘यांच्यावर’ फोडलं पराभवाचं खापर!
- “बायकी टोमणे मारण्यात मुलगा बाप से…”, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांचा टोला
- “…नाहीतर आम्हीही त्याच मैदानावर सभा घेऊ”, इम्तियाज जलील यांचा इशारा
- “हर्षदानं देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला”, अजित पवारांनी केले कौतुक
- “कायदा सुव्यवस्था सरकारच बिघडवत आहे”, मनसेचे टीकास्त्र