भाजप आमदाराचा प्रताप; हवालदाराला पोलीसस्टेशनमध्ये केली मारहाण

भोपाळ: मध्य प्रदेशमधील भाजपचे आमदार चंपालााल देवडा यांनी पोलीस ठाण्यात सर्वांदेखत एका पोलीस हवालदाराला कानाखाली मारल्याचा प्रकार भोपाळ पोलीसठाण्यात घडला आहे. संतोष इवांती असे त्या हवालदाराचे नाव असून, त्यांना देवडा यांनी केलेली मारहाण सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाली आहे. पोलिसांनी देवडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इवांती यांचा देवडा यांच्या मुलासोबत वाद झाला होता. त्यानंतर देवडा त्यांच्य काही समर्थकांना घेऊन उदयनगर पोलीस ठाण्यात आले व त्यांनी इवांती यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी देवडा व इवांती यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर देवडा यांनी इवांती यांना दोन वेळा कानाखाली मारल्या, तसेच त्यांच्या मुलाला त्रास दिल्यास परिणाम वाईट होतील अशी धमकी देखील दिली.

याप्रकरणी पोलिसांनी देवडा यांच्याविरोधात ऑन ड्युटी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

You might also like
Comments
Loading...