मोहन भागवतांनी बिहारमध्ये दंगल घडवण्याचा आखला होता कट- तेजस्वी यादव

पाटणा: लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोहन भागवत यांनी रामनवमीच्या दिवशी बिहारमध्ये दंगल घडवण्याचा कट आखला होता. त्यांनी बिहारमध्ये येवून १४ दिवसांमध्ये येथील कार्यकर्त्यांना दंगल कशी भडकावयची, याचे रीतसर प्रशिक्षण दिले. असे तेजस्वी यादव म्हणाले.

दरम्यान,  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील वातावरण बिघडवण्यासाठी काहीजणांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही, असे सांगितले. काही दिवसांपासून बिहारमध्ये तणावाचे वातावरण असून नवादा परिसरातील गोंदापूर चौकात धार्मिक स्थळाची तोडफोड झाल्यापासून बिहारमध्ये हिंसेचे वातावरण आहे.