टीम इंडियात रहाणेविरुद्ध रचला जातोय कट? गावसकरांनी केला आरोप

टीम इंडियात रहाणेविरुद्ध रचला जातोय कट? गावसकरांनी केला आरोप

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका येत्या ५ ऑगस्टपासुन सुरु होत आहे. हा सामना सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना भारताचे माजी क्रिकेटपटु सुनील गावसकर यांनी खळबळाजनक वक्तव्य केले आहे.

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने सुरुवातीला न्युझीलंडविरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने अप्रत्यक्षपणे पुजारावर निशाणा साधला होता. मात्र तो इशारा केवळ पुजारासाठी नव्हता. पुजाराचे नाव पुढे करत भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या विरोधात संघात कट रचला जात आहे. आसा खळबळाजनक आरोप माजी क्रिकेटपटु सुनील गावसकर यांनी केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी बोलताना पुढे गावसकर म्हणाले की,’इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर दबाव असणार आहे. कारण या दोघांना संघातुन बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.’ असे गावसकर यावेळी म्हणाले. डब्ल्युटीसी अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने संघात बदल करण्याचे संकेत दिले होते. हा इशारा पुजाराच्या बाबतीत होता असा सर्वांचा कयास होता. मात्र आता रहाणेचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अद्यापही या प्रकरणावर कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपुर्वी गावसकरांच्या या वक्तव्यामुळे क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या