नाटकांचे आता होणार ऑनलाइन प्रयोग

The plays

मुंबई : सद्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, त्यानंतर सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने मालिकांचं शूटिंग, नाटय़गृहे बंद होतं. मात्र आता काही अटीशर्तींचे पालन करत मालिकांचं शूटिंगला सुरुवात झाली आहे. रसिकांच्या मनोरंजनामध्ये अधिक भर घालण्यासाठी आणि आता बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत रंगकर्मी सज्ज झाली आहे.

कोरोना संकटामुळे नाटय़गृहे बंद असताना नाटकवेडय़ा मराठी रसिकांसाठी आता नाटकांचे ऑनलाइन प्रयोग ही नवी संकल्पना रूजू पाहत आहे. टाळेबंदीच्या काळात नाटकाला लागलेले कुलूप आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उघडण्याचा कलाकारांचा प्रयत्न आहे. नुकतेच, नाटकघर संस्थेतर्फे ‘परवा आमचा पोपट वारला’ या डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित नाटकाच्या अभिवाचनाचा ऑनलाइन प्रयोग अतुल पेठे यांनी सादर केला. तर आता प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक ॠषिकेश जोशी मराठीतील नेटक म्हणजेच इंटरनेटवरील नाटकाचा प्रयोग घेऊन रविवारी (१२ जुलै) रसिकांच्या भेटीस येत आहेत.

अतुल पेठे म्हणाले, ‘परवा आमचा पोपट वारला’ या रीतसर तिकीट लावून सादर केलेल्या ऑनलाइन नाटय़ अभिवाचनाच्या प्रयोगाला ६० जणांनी तिकिटे घेतली होती. त्यापैकी चारजण लंडन आणि अॅमस्टरडॅम येथून सहभागी झाले होते. जयेश आपटे, आलोक ताम्हणकर, आदित्य रहाणे, अमेय वर्तक, कस्तुरी सुटावणे-कुलकर्णी आणि शुभम जोशी या मित्रांनी प्रयोगाची तांत्रिक जबाबदारी घेतली. नाटकघर, रावी मोशन पिर्स आणि वायर्ड एक्सप्रेशन या तीन संस्थांनी एकत्र येऊन हा प्रयोग केला.

पुढे ते म्हणाले, ‘ही कोरोना भानगड दिवसेंदिवस अनिश्चित होत जात असताना काही करून पाहण्याची प्रामाणिक खटपट यशस्वी झाल्यामुळे मजा आली. प्रयोगाच्या आधी ऑनलाइन तालीम केली. माझ्या घरात प्रयोगाला अनुकूल जागा तयार करून रंगमंच व्यवस्था केली. आवाजाची चाचणी घेतली. मी तीन घंटा दिल्यावर प्रयोग सुरू झाला. मोबाइलच्या अंदाजाने आणि कानात खुपसलेल्या हेडफोनवर अंदाज घेत प्रयोग केला. शिवाय नाटक पाहायला लोक उत्सुक आहेत हा धीर मिळाला’.

ॠषिकेश जोशी दिग्दर्शित ‘मोगरा’ या इंटरनेटवरील नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवारी (१२ जुलै) सादर होणार आहे. तेजस रानडे लिखित नाटकामध्ये वंदना गुप्ते, भार्गवी चिरमुले आणि स्पृहा जोशी यांच्यासह पाच कलाकारांचा समावेश आहे. ॠषिकेश जोशी यांनी असा विश्वास व्यक्त केला कि, ‘नाटकाच्या प्रयोगाचे कॅमेऱ्यावर चित्रीकरण करून तांत्रिकदृष्टय़ा प्रेक्षकांपर्यंत विनासायास पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मराठीमध्ये प्रथमच होत असलेल्या या वेगळ्या प्रयोगाच्या पाठीशी मायबाप प्रेक्षक खंबीरपणे उभे राहतील’.

नेटकऱ्यांच्या टीकेपासून वाचण्यासाठी आलिया भटने घेतला मोठा निर्णय

‘या’ मालिकेतील कलाकाराला झाली कोरोनाची लागण; थांबवलं शूटिंग

काँग्रेसला पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही