प्लास्टिक उत्पादकांकडून निवडणुकीसाठी फंड जमवण्यासाठीच ही प्लास्टिकबंदी लागू : राज ठाकरे

raj-thackeray

मुंबई : देशाचं किंवा राज्याचं धोरण हे एखाद्याला आलेला झटक्याने ठरू शकत नाही. प्लास्टिकबंदीला कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता नागरिकांकडून दंड आकारणं योग्य नाही. सरकारच्या नाकर्तेपणाचा दंड जनतेला कशासाठी?, असा थेट सवाल करत राज्य सरकारवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज हल्लाबोल केला. प्लास्टिक उत्पादकांकडून निवडणुकीसाठी फंड मागण्यात आला होता आणि तो जमवण्यासाठीच ही प्लास्टिकबंदी लागू करण्यात आलीय, असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.

साधं सरकारला, नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्यांचीही व्यवस्था करता येत नाही. जोपर्यंत सर्व सुविधा मिळत नाही, तोपर्यंत दंड देऊ नका, असं आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि महापालिकेवर टिकास्त्रच सोडले आहे. हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा की एका खात्याचा हेच मला समजत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयात तातडीनं लक्ष घातलं पाहिजे, असं सल्लाही राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे

 

 • बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठेंवरील कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात
 • निर्णय सरकारने घेतला, उत्तर सरकारने द्यावं, रामदास कदमांनी नात्यावर भाष्य करू नये
 • निर्णय सरकारनं घेतलाय, त्यामुळे सरकारनंच उत्तर द्यावं
 • स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली निव्वळ कर आकारणी
 • इतर अनधिकृत गोष्टींवर कारवाई करण्यासाठी का धजावत नाही?
 •  नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्यांचीही व्यवस्था नाही
 • जोपर्यंत सर्व सुविधा मिळत नाही, तोपर्यंत दंड देऊ नका
 •  दंड आकारायला माझा विरोध आहे
 •  महापालिका प्रशासनानं आणि सरकारनं स्वतःचं काम नीट करावं
 •  मुख्यमंत्र्यांनी प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयात तातडीनं लक्ष घातलं पाहिजे
 •  महापालिका आधी स्वतःची जबाबदारी पार पाडतेय का ?
 •  प्लॅस्टिक बंदीमागे राजकीय फंडाचं गणित तपासून पाहिलं पाहिजे
 •  कचरा टाकायला कचराकुंड्या पाहिजेत
 •  एखाद्याला आलेला अचानक झटका म्हणजे धोरण नव्हे
 •  सरकारनं प्लॅस्टिकबंदीवरची कारवाई थांबवावी
 •  प्लॅस्टिक बंदी करताना इतर पर्याय तुम्ही आणलात का?
 •  सरकारनं स्वतःची काम नीट करावी आणि मगच लोकांना उपदेश करावेत
 •  प्लॅस्टिक बनवणा-या कंपन्यांकडून फंड मागितला गेला
 •  हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा की एका खात्याचा
 •  नाशिकमध्ये मनसेनं कच-यापासून खत प्रकल्प तयार केले
 •  बंदी असेल तर सर्व प्लॅस्टिक बंद करावं
 •  तुमचं संपूर्ण आयुष्य प्लॅस्टिकनं गुंडाळलेले आहे
 •  प्लॅस्टिकबंदीची एवढी घाई कशाला ?
 •  व्हॉट्सअॅपवर फिरणारे मेसेज ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही