मुंबई लोकलमध्ये बॉम्ब स्फोट करण्याचा होता प्लॅन; रेल्वे पोलिसांनी बोलावली तातडीची बैठक

mumbai police

मुंबई : आगामी नवरात्रोत्सवादरम्यान महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकंदर सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली आहे. दरम्यान या कटात पकडला गेलेला एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी येथे राहणारा होता. यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबईतील धारावीत राहणारा जान मोहम्मद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो गेल्या 20 वर्षांपासून दाऊद कंपनीच्या संपर्कात होता अशी माहिती एटीएस प्रमुखांनी दिली आहे. काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचे उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आज तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे.

तर यामुळेच आता रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे पोलिसांची एक महत्त्वाची बैठक रेल्वे मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. रेल्वे आयुक्त कैसर खालिद यांच्यासह डीआरएमचे मोठे अधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत रेल्वेच्या सुरक्षेवरही चर्चा होणार आहे, अशी माहिती सध्या मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या