fbpx

‘जैश ए मोहम्मद’चा म्होरक्या मसुद अझरचा ठिकाण कळाला?

नवी दिल्ली – पुलवामा येथील सीआरपीएफ हल्ल्यानंतर सोमवारी मध्यरात्री हवाई दलाच्या १२ मिराज विमानांनी पाकव्याप्त कश्मीरात घुसुन जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर १००० किलोच्या बॉम्बने हवाई हल्ले केले. अवघ्या २१ मिनिटात हवाई दलाने जैशचे तळ नेस्तनाबूत केले आहेत.

या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. यातच जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलादा मसूद अझर याचा ठिकाणा गुप्तचर यंत्रणांना लागल्याची माहिती मिळत आहे.

बालाकोट हल्ल्यानंतर भारताचे पुढील टार्गेट मसूद अझर हे आहे. आता त्याचा ठावठिकाणा कळाल्याने तो मारला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सॅटेलाईटच्या मदतीने गुप्तचर यंत्रणांनी मसूदचा पत्ता लावला आहे. ज्याप्रकारे अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जाऊन लादेनला मारले होते त्याप्रमाणे भारत कारवाई करणार का हे पाहावं लागेल. भारत-पाकिस्तान सीमेवर हालचाली वाढल्या असून युद्धाचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये आता भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये फायटर जेट्सच्या माध्यमातून तब्बल एक हजार किलोचे बॉम्ब अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर बरसवण्यात आले आहेत. कारगिल युद्धानंतर प्रथमच फायटर जेटच्या माध्यमातून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.