सेल्युलर जेल देशभक्तांचे आणि क्रांतिकारकांचे तीर्थस्थान

भावना संचेती : अविश्वसनीय सौंदर्य, निळशार पाणी आणि समुद्र किनारा, भारतातील निसर्गरम्य स्वर्ग म्हणजेच अंदमान! बंगालच्या उपसागरात असलेला, निळ्याशार पाण्याने वेढलेला अंदमान-निकोबार हा द्वीपसमूह. हजारो देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण बनलेला. भारताच्या पर्यटनातील एक माणिक. कल्पनातीत सौंदर्याने नटलेलं एक अनोखं जग. हॉलीवूडच्या चित्रपटातून अशी भुरळ पाडणारी बेटं पाहताना आपल्या देशातदेखील याच्याच तोडीस तोड निसर्गसौंदर्य आहे हेच कधी कधी आपण विसरलेलो असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जोडीला ‘सेल्युलर जेल’च्या रूपाने आपल्या धगधगत्या इतिहासाची साददेखील असते. मराठी माणूस सावरकरांमुळे या बेटांशी खूप भावनिकरीत्या जोडलेला असतो. सावरकरांनी आणि इतर अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातनांचं प्रतीक म्हणजे तेथील सेल्युलर जेल.

सेल्युलर जेल नक्की कोठे आहे?- भारतामध्ये दोन बेटे आहे. अंदमान व निकोबार. अंदमान बेटावर सेल्युलर जेल वसवलेले आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह हा भारताच्या आग्नेयेस असलेला एक केंद्रशासित प्रदेश आहे. अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी आहे. या बेटाचे क्षेत्रफळ ८,२४९ चौ.किमी आहे. अंदमान आणि निकोबार या बेटसमूहाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरमध्ये सेल्यूलर जेल आहे.

सेल्युलर जेल का प्रसिध्द आहे – अंदमानात १० मार्च १८५८ पासून रानावनात राहून जन्मठेप भोगणाऱ्या आणि नंतरच्या काळात सेल्युलर जेलमध्ये नरकयातना भोगलेल्या व तेथेच देह ठेवलेल्या हुतात्म्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या भारतातील एकमेव सेल्युलर जेलखरं तर, इतर अनेक वास्तूंप्रमाणे हे जेलही ब्रिटिशांच्या स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. स्वातंत्र्याचा लढा लढणाऱ्या, भारतीय कैद्यांच्या रक्ता-मांसातून बांधलेलं हे काळ्या दगडाचं एक अजस्त्र तुरुंग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेक क्रांतिकारकांवर अनन्वित अत्याचार करण्यात आलेले सेल्युलर जेल,

सेल्युलर जेलची निर्मिती का करण्यात आली- अंदमान बेटाची ऐतिहासिक पार्श्वभूमी रंजक पण मानवी वृत्तीची खेदजनकताही त्यात दिसते. या बेटांवरील आदिवासी जंगलातील काही जणांना पळवून आणून गुलामगिरी करायला लावले जायचे. मलाया लोकांनी यात पुढाकार घेतला. या प्रदेशाला ते Handuman म्हणत. रामायणातील हनुमानाच्या धर्तीवर; पण पुढे त्याचे अंदमान झाले. आर्कीबोल्ड ब्लेअर याची नियुक्ती या प्रदेशाचा आणि समुद्राचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिशांकडून केली गेली. बेटांवर वास्तव्य करण्यात पुष्कळ अडथळे येत. या सर्व मंथनातून हिंदुस्थानी स्वातंत्र्यचळवळीतील स्वातंत्र्यसैनिकांना येथे पाठवून देण्याचा निर्णय ब्रिटिश राज्यसत्तेने घेतला. इ.स. १८५८च्या दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी पोर्ट ब्लेअर याने सुरू केली. स्वातंत्र्यसैनिकांची पिळवणूक चालूच होती. विशेषतः महाराष्ट्र, बंगाल, पंजाब वगैरे राज्यांतून आलेले स्वातंत्र्यसैनिक होते. दुसऱया महायुद्धात जपानने या प्रदेशाचा ताबा घेतला. स्वातंत्र्यसैनिकांची जंत्री बनविण्याचे काम त्यांनी केले. ब्रिटिशांना चांगलाच हादरा दिला. त्याआधी ब्रिटिशांनी सेल्युलर जेलची निर्मिती केली होती आणि स्वातंत्र्यसैनिकांसाठी ६९९ खोल्या विशिष्ट रचनेतून निर्माण केल्या गेल्या होत्या. जंगल तोडणे, वस्ती वाढविणे या गोष्टी ब्रिटिशांनी केल्या, पण प्रदेशाचे तुरंगात रूपांतर करताना आदिवासींसाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही केले नाही.

काळ्या पाण्याची शिक्षा असे का म्हटले जात – कठोर शिक्षेमुळे कैद्यांचे जीवन अंधकारमय होत असे. त्यांना जिवंतपणी नरक यातना भोगाव्या लागत असत . अशात कठोर यातनामय शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा समजत. काळ्या पाण्याच्या शिक्षेस सुरुवात १७८९ मध्ये झाली. सतराव्या शतकात अंदमानला ११ महिने पाऊस पडत त्यामुळे मलेरिया , डास , गोम , व इतर त्रासदायक कीटक ,प्राणी ,साप , विंचू , यांचा प्रचंड सुळसुळाट होता. रोगराईमुळे बळी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक होती. अंदमान – निकोबार समुद्रकिनारी असल्यामुळे दमट वातावरण होते. त्यामुळे बसल्याजागी घाम फुटत. यातून जे वाचायचे त्यांची शिकार होत. ब्रिटिशांचा शारीरिक छळ ,उपासमार, सहन करावी लागत यामुळे गेलेला व्यक्ती परत येईल का याची खात्री नव्हती. अंदमान-निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत.प्रत्येक कोठडीची रचना अशी की खिडकीतून उजेड येईल पण बाहेरचा सूर्य दिसणार नाही. प्रात:विधी आटोपण्यासाठी कोठडीत एक भांडं ठेवलेलं. कोठडीची कडी भिंतीत जवळजवळ फुटभर आत गेलेली.

डेव्हिड बारी

जेल च्या आवारात एक पिंपळाच झाड आहे. त्याला बेरीबाबा का पेड म्हणतात. तिथला त्याकाळचा जेलर बेरी ह्याच ते निवाड्याचं स्थान होतं. बारीसाहेब म्हणजे डेव्हिड बारी, जे तेव्हा सेल्युलर जेलचे जेलर होते. ६९३ खोल्यांच्या भव्य जेल आणि त्याचा सर्वेसर्वा डेव्हिड बॅरी ह्याने स्वतःच्या राज्यकर्त्यांचे आदेश पाळण्यासाठी आणि इंगजी सत्ता वाचवण्यासाठी येथे क्रांतिकारकांवर अतोनात जुलूम केले,आयरिश मूळच्या बारींचा धाक असा होता की त्यांना ‘लॉर्ड ऑफ पोर्ट ब्लेअर’ म्हटलं जात असेइथुनच तो गोड शब्दात कैद्यांचे निवाडे करत असे/ शिक्षा करत असे.
सेल्युलर म्हणजे काय – ब्रिटीशांना सुरूवातीला अंदमान मध्ये फार इंटरेस्ट नव्हता कारण हवा दमट, बाकी सोई काही नव्हत्या पण नंतर स्वातंत्र्य लढ्यातील लोकांना इतरांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून अंदमानचा उपयोग त्यांनी करून घेतला. इथून कॆद्यांना कुणाशी संपर्क ठेवता येत नसे. कॆद्यांचे खूप हाल करत पण ते मेन लॅंड वर पोचत नसे. या जेलला सेल्युलर जेल म्हणत कारण प्रत्येकाला एका वेगळ्या खोलीत ठेवत व इतरांशी संपर्क करता येत नसे. क्रमश: …