…तर राज्यातील सहकारी साखर उद्योगाचे चित्र बदलेल-आमदार जयंत पाटील

jayant-patil

सातारा : एखाद्या संस्थेचे नेतृत्व जर मदनदादा भोसले यांच्यासारखे विधायक-रचनात्मक, दुरदृष्टीचे आणि स्वतःला झोकून देऊन काम करणारे असेल तर त्या संस्थेचा सर्वांगिण चौफेर विकास कसा होतो, याचे किसन वीर साखर कारखाना हे उत्तम उदाहरण आहे. किसन वीर कारखान्यासारख्या दिशादर्शक संस्था उभ्या राहिल्या तर राज्यातील सहकारी साखर उद्योगाचे चित्र बदलेल, असा विश्वास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Loading...

आमदार पाटील यांनी किसन वीर साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार पाटील पुढे म्हणाले, ज्येष्ठ नेते प्रतापरावभाऊ भोसले माझ्या वडिलांचे खास मित्र होते. भाऊंचा सर्व क्षेत्रातील विषयांचा चांगला अभ्यास आहे. त्यांच्याशी माझ्याही विविध विषयांवर चर्चा-गप्पा व्हायच्या. त्यांच्याप्रती नेहमीच मला आदर वाटतो. प्रतापरावभाऊंच्या नंतरची पुढची पिढी राजकारण-समाजकारणात काम करणार की नाही, असं मला वाटलं होतं. जुना कारखाना नजरेसमोर ठेऊन मदनदादांना भेटायला या ठिकाणी आलो. साखर कारखान्याचा अनुभव नाही. सहकाराची आवड निर्माण झाली म्हणून एक साखर कारखाना चालवितो. कारखाना चालविणं किती मुश्किल आहे, याची जाणीव झाली. ऊस तोड मजूरांची पुढची पिढी आता हातात कोयता घ्यायला तयार नाही, हे लक्षात घेऊन यांत्रिकी पद्धतीने ऊस तोडीला प्राधान्य द्यावे लागेल. खर्च कमी करावे लागतील. कारखान्याचा प्रत्येक अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षित असला पाहिजे. त्यांनी आपल्या विभागाचा सुक्ष्म अभ्यास करून संस्थेचे हित पाहिले पाहिजे. तरच ती संस्था वाढते, टिकून राहते. त्यामुळे कर्मचा-यांबरोबरच संस्था,शेतकऱ्यांचा विकास होतो, असे सांगून आमदार पाटील यांनी त्यांच्या संस्थांचे काम पाहण्यासाठी किसन वीर परिवाराने आलिबागला यावे, असे आवाहन केले.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...