कारागृहातून ‘राम रहिमच’ प्रवचन ऐकण्याची याचिका फेटाळली

gurmit ram rahim

टीम महाराष्ट्र देशा: साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी कारागृहात २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाच्या बाबा राम रहिमची प्रवचन देण्याची हौस अद्याप फिटलेली नाही. रोहतक कारागृहात कैद असलेल्या या बाबाला आपल्या भक्तांसाठी न्यायालयातून प्रवचन द्यायचे आहे. प्रवचनाच्या परवानगीसाठी बाबाच्या वतीने एका भक्ताने न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मात्र उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

Loading...

गेल्यावर्षी हम रहीमला दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचारात १२६ कोटींहून अधिकचे नुकसान झाले आहे. अॅडव्हकेट जनरल यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. तसेच या हिंसाचारात ३६ जणांचा मृत्यू झाला होता. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमच्या वतीने मालवा इंसा फॉलोवर्स डेरा सच्चा सौदा असोसिएशनचे अध्यक्ष देव राज गोयल यांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज २४ जानेवारीला सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.Loading…


Loading…

Loading...