औरंगाबाद विद्यापीठातील पुतळ्याच्या विरोधातील याचिका निकाली

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळा उभारणीला विरोध करणारी याचिका खंडपीठाने निकाली काढली. कुलगुरू डॉ बी ए चोपडे यांनी विद्यापीठनिधीतून चाळीस लाख खर्च करून पुतळा बसवण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. पुतळा उभारणीस विरोध करणारी याचिका सचिन रतन शिंदे यांनी दाखल केली होती.

औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी ए चोपडे यांनी विद्यापीठ निधीतून ४० लाख खर्च करून पुतळा बसवण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. मात्र काही संघटनांनी विद्यापीठ निधीतून पुतळा उभारण्यास तीव्र विरोध केला होता. तर मराठा संघटनांनी पुतळा उभारण्याची मागणी कुलगुरूना केली होती.

पुतळा उभारणीस विरोध करणारी याचिका शिंदे यांनी न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका ५ मार्च रोजी निकाली काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळा उभारणीला विरोध करणारी याचिका खंडपीठाने निकाली काढत राज्य शासनाने ठरवलेल्या धोरणाप्रमाणे प्रस्तावित पुतळ्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यावा. असे निरक्षन खंडपीठाचे न्यायमूर्ती आर एम बोर्डे आणि के.के. सोनवणे यांनी नोंदवले आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी