fbpx

‘महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणारा व्यक्ती मंत्री होतो’

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र राज्याचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात १३ नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. दुसरीकडे मात्र यावरून, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणारा व्यक्ती मंत्री होत असेल तर यापेक्षा राज्याचे दुर्दैव काय असेल? असे निलेश राणे म्हणाले आहेत.

रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसनेच्या दोन आमदारांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यात, विधान परिषदेचे आमदार तानाजी सावंत यांचा समावेश आहे. सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून निलेश राणेंनी शिवसेनचा चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला जर मंत्रिमंडळात संधी मिळत असेल तर, महाराष्ट्राचा यापेक्षा मोठ दुर्दैव कोणते असेल, असे राणे म्हणाले.