या देशातील जनतेची लूट पेट्रोल-डिझेलची दरवाढ करुन सरकारने केली- जयंत पाटील

निवडणूका झाल्या की भाजप पक्ष कुणाचाच नसतो हे पुन्हा भाजपने सिध्द केले

मुंबई  – पेट्रोल आणि डिझेलची या देशामध्ये एवढी मोठी दरवाढ करण्याचा प्रयत्न झाल्यावर त्याचा दुष्परिणाम मतांवर दिसायला लागला आणि म्हणून भाजपने मागच्या १९-२० दिवसात कर्नाटकातील मतदानाकडे बघून दर वाढवून दिले नाहीत. याचा अर्थ भाजप दर नियंत्रणात ठेवू शकते आणि कमीही करु शकते. या देशातील जनतेची लूट पेट्रोल-डिझेलची दरवाढ करुन सरकारने केलेली आहे.

आता निवडणूका संपल्या, काम झालं पुन्हा जनतेच्या दारात जाण्याची गरज नाही. त्यामुळे पाहिजे तेवढे दर वाढवायला भाजपला आता मोकळीक झाली आहे आणि त्यापध्दतीने त्यांनी दरवाढ केली आहे. शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला, मध्यमवर्गीयांना, शहरात राहणाऱ्या,ज्यांचं पगारावर घर आहे. अशांना फसवण्याचा कळस म्हणजे काल वाढलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आहे. निवडणूका झाल्या की भाजप कुणाचाच नसतो हे पुन्हा भाजपने सिध्द केले आहे

You might also like
Comments
Loading...