देशातील जनतेने ‘मत’ राम मंदिरासाठी दिले होते; ट्रीपल तलाख साठी नव्हे- प्रविण तोगडिया

Pravin Togadia

औरंगाबाद: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी लवकरात लवकर राम मंदिरासाठी संसदेत कायदा पास करा आणि विवादीत जागेवरचा राम मंदिराचा मार्ग मोकळा करा असा इशारा दिला आहे.

देशातला सगळ्यात वादग्रस्त आणि जुना खटला असलेल्या रामजन्भूमीची सुनावणी सुप्रीम कोर्टात आज सुरू होईल. आता पुढची सुनावणी १४ मार्चला होणार आहे. या प्रकरणाबद्दलच बोलताना कायदा पास करण्याची सुचना त्यांनी दिली. प्रवीण तोगडिया म्हणाले, संसदेत राममंदिरासाठी कायदा व्हायला हवा. हा कायदा झाल्यास राम मंदिर होईल. पण तसंच मशीद उभी राहु शकणार नाही. तसेच देशातील जनतेने मत ही राम मंदिराच्या उभारणीसाठी दिले होते. ट्रीपल तलाख साठी नव्हे असा टोला त्यांनी सरकारला लगावला. हैदराबाद चे खासदार ओवैसी यांच्यावर टीकास्त्र सोडत हैद्राबादमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या कोणाविषयीही मी काही बोलणार नाही असंही ते म्हणाले.