अर्जुनी मोरगावातील लोकांना मिळणार हक्काची घरे, पाठपुरावा करणाऱ्या या नेतृत्वाला मिळाले यश  

gharkul yajana

अर्जुनी मोर : मागील अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला रमाई घरकूल योजनेचा निधी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नाने अजुर्नी मोरगाव विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे. गेल्या दोन वषार्पासून रमाई घरकूल योजनेची प्रकरणे व बांधकाम अनुदान निधी प्रलंबित होता.

आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांच्याशी सतत पत्रव्यवहारासह प्रत्येक्ष भेटून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याने रमाई घरकूल योजनेचा प्रलंबित अनुदान निधी अजुर्नी मोरगाव विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.

अजुर्नी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील रमाई घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना निधी उपलब्ध न झाल्याने अनेक लाभार्थ्यांचे घरकुलचे बांधकाम रखडून होते. काहींनी उधार उसने तर कर्ज घेऊन बांधकाम पूर्ण केले. महिने लोटूनही अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा न झाल्याने लाभार्थ्यांनी संबंधित कार्यालय गाठून सत्यता जाणली असता शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली.

यानंतर लाभार्थ्यांनी आ. चंद्रिकापुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे निधी उलब्ध करून लाभार्थ्यांना देण्याची मागणी केली होती. चंद्रिकापुरे यांनी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली.

मागील दोन वषार्पासून अनेक रमाई घरकूल योजनेची प्रकरणे स्थानिक प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. निधीअभावी अनेक घरकुलांचे बांधकाम रखडलेले होते. अजुर्नी मोरगाव विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती प्रवगार्साठी राखीव असल्याने या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती प्रवगार्तील नागरिकांचे वास्तव्य आहे. येथील नागरिक शेतीवर निर्भर असून त्यांचा निवासाचा प्रश्न अत्यंत बिकट परिस्थिती आलेला होता.

अनेक लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचा निधी उपलब्ध झाला असला तरी काही लाभार्थ्यांना पहिलाच हप्ता न मिळाल्याने रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी चिंतेत होते. मनोहर चंद्रिकापुरे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व प्रधान सचिव श्याम तागडे यांच्याकडे सतत पुरवठा केल्याने रमाई घरकूल योजनेचा निधी गोंदिया जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला असल्याची माहिती आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या कार्यालय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :-