जो पक्ष आपल्या मित्र पक्षांना सांभाळू शकत नाही, तो जनतेला काय सांभाळणार? : हर्षवर्धन पाटील

टीम महाराष्ट्र देशा – भाजपने गेल्या चार वर्षांत काय काम केले, हा संशोधनाचा विषय आहे. सांगलीच्या विकासासाठी एक दमडीही भाजपने दिली नाही. त्यांच्या भूलथापांना भुलून जवळ गेलेले खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना हे त्यांना सोडून चालले आहेत. जो पक्ष आपल्या मित्र पक्षांना सांभाळू शकत नाही, तो जनतेला काय सांभाळणार? असा सवाल उपस्थित करत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजप वर हल्ला चढवला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ रविवारी दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या हस्ते हरिपूर येथील बागेतील श्री गणेश मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेस भवनसमोर झालेल्या प्रचार सभेत आघाडीच्या नेत्यांची घणाघाती भाषणे झाली. सर्वच नेत्यांनी भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली.

 

Karnataka Election; भाजपने सत्तेचा दुरुपयोग करू नये, राज ठाकरेंचा सल्ला

Karnataka Election; भाजपला आणखी एका आमदाराचा पाठींबा