fbpx

विरोधात एकत्र आलेले पक्ष हे सत्तेसाठी हापापले – मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आलेले पक्ष हे आता सत्तेसाठी चांगलेच हापापले आहेत. त्यांना विकास नाही फक्त सत्ता पाहीजे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने मोठा पुढाकार घेतला आहे. यापूर्वी दुष्काळाचे अनुदान हे कधीही शेतकर्‍यांपर्यंत जूनपूर्वी पोहोचत नव्हते. पण, आता 15 मार्चपर्यंत त्यांच्या प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे जमा होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून सुद्धा शेतकर्‍यांना मदत प्राप्त होणार आहे. आता आपल्या पंतप्रधानांनी प्रतिवर्षी 6000 रूपये अनुदान शेतकर्‍यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. मला खात्री आहे की, ही फक्त सुरूवात आहे आणि अशा योजनांमध्ये आणि त्यातून मिळणार्‍या लाभांमध्ये येणार्‍या काळात वाढच होणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणले.