पक्षातील गद्दारांना जागा दाखवण्याची गरज; राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक!

sharad pawar ncp

टीम महाराष्ट्र देशा: आज वाशी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.  यावेळी आगामी कोकण पदवीधर निवडणुकांसाठी राष्ट्रवादीतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.  राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले निरंजन डावखरे यांच्या विरोधात खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत.

शिवराज्याभिषेकाच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला. यासारखा चांगला मुहूर्त नाही अशी प्रतिक्रिया नजीब मुल्ला यांनी दिली. तसेच शिवाजी महाराजांनी कधीच गद्दारांना माफ केले नाही. पक्षातील गद्दारांनाही जागा दाखवण्याची गरज आहे असे वक्तव्य त्यांनी केले.

दरम्यान, “आज तरुण वर्ग नाराज आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये तरुणांची मते महत्त्वाची ठरतील. देश परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे असे सांगतानाच या निवडणुकीत आपण नक्की विजय संपादित करु”, असा विश्वास राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे  यांनी व्यक्त केला.Loading…
Loading...