हल्लाबोल आंदोलनात युवकांचा सहभाग रेकॉर्ड ब्रेक असावा -डॉ.क्षितिज घुले

hallabol

शेवगाव : तालुक्यात राष्ट्रवादीच्या वतीने १५ तारखेला आयोजित करण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या जण जागृतीसाठी शेवगाव येथील बाजार समितीच्या प्रांगणात पार पडलेल्या भव्य युवक मेळाव्यात हल्लाबोल आंदोलनात युवकांचा सहभाग हा रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचा असावा असे प्रतिपादन सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर युवक उपस्थित होते.तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी बाजार समितीचे सभापती संजय कोळगे,अजिंक्य लांडे,आयुब पठान,अजय भारस्कार,कैलास तुजारे,नगरसेवक शब्बीर शेख,संतोष जाधव हे उपस्थित होते. ताहेर पटेल यांनी सूत्रसंचालन केले आणि आलिम शेख यांनी आभार मानले.Loading…
Loading...