कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला

नवी मुंबई: कुख्यात डॉन अबू सालेम याने निकाहसाठी तळोजा कारागृह प्रशासनाकडे ४५ दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला होता. मात्र, अर्ज फेटाळण्यात आला आहे. सालेमने कौसर बहार नावाच्या नव्या प्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी अर्ज केला होता.

अबू सालेम सध्या नवी मुंबईतील तळोजा कारागृहात सध्या तो शिक्षा भोगत असून १९९३ च्या स्फोट प्रकरणातील सहभागासाठी टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अबू सालेम याच्या निकाहसाठी ५ मे तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी सालेमचा पॅरोल फेटाळला आहे.