इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या संघाला स्पॉन्सर्स मिळेनात

The Pakistan team

लंडन – जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. याचा मोठा परिणाम क्रीडा क्षेत्रावर देखील पाहायला मिळत आहे.अनेक मालिका रद्द होत आहेत त्यामुळे क्रिकेट रसिक आणि खेळाडू हतबल झाल्याचे चित्र आहे. यातच आता इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघासमोर वेगळंच संकट उभं राहिलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाला तेथे स्पॉन्सर्स मिळेनासे झाले आहेत आणि आतापर्यंत केवळ एकाच कंपनीनं स्पॉन्सरशीपसाठी बोली लावली आहे. कोरोना व्हायरसमुळे कोणी स्पॉन्सर्स पुढे येत नसल्याचे पीसीबीच्या मार्केटींग विभागानं सांगितले. याशिवाय पीसीबीला स्थानिक क्रिकेट स्पर्धांसाठीही स्पॉन्सर शोधण्यात अडचण येत आहे.

आधीच्या स्पॉन्सर्ससोबतचा करार केव्हाच संपुष्टात आला आहे आणि त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी खेळाडूंच्या ट्रेनिंग किटवर एकच लोगो दिसत आहे. एका कंपनीनं लावलेल्या बोलीची किंमत ही पीसीबीच्या जून्या स्पॉन्सर्सच्या रकमेतील 30 टक्केच रक्कम भरून काढत आहे.

गुरुपौर्णिमा विशेष : भक्ती शक्ती संगम – श्री रामदास स्वामी

मेरे लिए दुआ करें…’ पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी कोरोना पॉझिटिव्ह

शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यपदाचा राजीनामा