सत्ता गेल्याची वेदना सखोल, हे यातून दिसतंय; शरद पवारांनी उडवली फडणवीसांची खिल्ली

मुंबई : आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं हे कधीही चांगलं. वेदना किती खोल आहे हे यातून दिसतं, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली. मी अजूनही मुख्यमंत्री म्हणणाऱ्या फडणवीसांचं अभिनंदन!, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नावर सविस्तर उत्तरे देत केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो, असं सांगतानाच सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही पवार यांनी दिला.

‘गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांशी बोलतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. मला जनतेनं कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही. त्यामुळं मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करतोय. ज्या दिवशी जनतेचा आशीर्वाद मिळेल, त्या दिवशी पुन्हा इथं देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईन,’ असंं फडणवीस म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या