महाविकास आघाडीचे ‘जनक देवेंद्र फडणवीस’ आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीचे जनक हे महाराष्ट्राचे माजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असे मत शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे मिसळ हाऊस कट्टा येथे बोलताना व्यक्त केले .पाटील पुढे म्हणाले की जर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरला नसता,थोडीशी नरमाईची भूमिका घेतली असती तर अशी तीन पक्षाची युती झाली नसती , आणि कॉंग्रेस,राष्ट्रवादीच्या पाठींब्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते.

शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार राहिले आहेत. शिरूर लोकसभा मतदार संघ हा मतदार संघ पुनर्रचना कायदा २००२ नुसार २००९ साली अस्तित्वात आला आहे.या मतदार संघात जुन्नर ,आंबेगाव,खेड आळंदी ,शिरूर ,भोसरी आणि हडपसर या विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो.

Loading...

२००९ साली या मतदार पहिल्यांदा खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील निवडून आले. ही त्यांची खासदार म्हणून दुसरी टर्म होती. याआधी ते खेड लोकसभा मतदार ( त्यावेळी अस्तित्वात असणारा ) संघातून निवडून आले होते.त्यानंतर त्यांनी २०१४ साली सुद्धा आपला गड कायम राखला.पण २०१९ साली त्यांचा पराभव झाला.यामागे सिनेअभिनेता छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांच्या भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांच्यासारखा प्रसिद्ध चेहरा देत राष्ट्रवादीने खेळी केली.

अमोल कोल्हे यांना ६३५८३० एवढी मते मिळाली तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना ५७७३४७ एवढी मते मिळाली.५८४४८ मतांनी कोल्हे यांनी पाटलांचा पराभव केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका