‘निसर्ग’चं तांडव सुरू; चक्रीवादळाची महाराष्ट्रात धमाकेदार एन्ट्री

Cyclone

पुणे – कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दारावर आले असून चक्रीवादळानं बुधवारी दुपारी एक वाजता जमिनीला स्पर्श केला. वाऱ्याचा वेग वाढत आहे. किनारपट्टी परिसरात पाऊसही कोसळत आहे. या वादळाचा मुंबई, रायगड, रत्नागिरीसह अनेक भागाला तडाखा बसणार आहे.

दरम्यान, या वादळाचा प्रकोप कोकणातील प्रदेशांसह नाशिक, पुणे या भागांना देखील जाणवणार आहे. सध्या किनारपट्टी भागात ताशी १०० हून अधिक वेगाने वारे वाहत आहेत. ज्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडत आहेत. तर काही घरांवरील पत्रेही उडून जात आहेत. सध्या या वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर इथून राज्यात एन्ट्री केली आहे.

याचा सर्वाधिक परिणाम हा रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, दिवे-आगार, अलिबाग, मुरुड येथील किनारपट्टी भागाला बसला आहे. या वादळावर सॅटेलाईटच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. निसर्ग चक्रीवादळात कोणतीही जीवीतहानी होऊ नये यासाठीही सर्व व्यवस्था केली जात असून लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं जात आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) २१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आतापर्यंत त्यांनी १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

‘सरकारने पास केलेल्या विद्यार्थ्यांना ‘कोरोना ग्रॅज्युएट’ म्हणून तर संबोधले जाणार नाही ना?’

मला विश्वास आहे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेईल – नरेंद्र मोदी

पुण्यात कोरोनाची लस विकसित करण्यासाठी ३० माकडांवर होणार प्रयोग