मैदान भाड्याने दिल्यामुळे विद्यापीठाला तातडीने नोटीस बजाविण्याचे आदेश

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नागराज मंजुळे मुळे अडचणीत आले आहे. विद्यापीठाने राज्य सरकार, उच्च शिक्षण संचालन यांची कोणतेही परवानगी न घेता विद्यार्थांचे खेळण्याचे मैदान परस्पर निर्णय घेऊन भाड्याने दिले आहे. त्यामुळे विद्यापीठाला आता कारवाईला सामोरे जावं लागणार आहे. विद्यापीठाला तातडीने नोटीस बजाविण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मैदानावर सेट नियमबाह्य पद्धतीने उभारल्या प्रकरणी विद्यापीठाला तातडीने नोटीस बजाविण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले आहे. सात दिवस विद्यापीठाने सेट प्रकरणात योग्य कारवाई किंवा विद्यार्थीहीत निर्णय घेतला नाही तर सेट जप्त करण्याची किंवा नियमानुसार करण्याची कारवाई उच्च शिक्षण संचालनालयाने, जिल्हा प्रशासनाने करावी, असे आदेश देखील वायकर यांनी बैठकीत दिले. विद्यापीठाने नियमबाह्य कारभार केल्याचे वायकर यांनी सांगत न्याय सर्वाना समान असला पाहिजे, असे सांगितले. आमदार मेधा कुलकर्णी यांनी देखील हा मुद्दा बैठकीत उपस्थित केला होता.

You might also like
Comments
Loading...