नववी आणि दहावीसाठी भाषांची तोंडी परिक्षा रद्द

std.5th & 8th sclorship exam on 18th feb,2018

मुंबई : यंदा दहावीतील शेकडो विद्यार्थीचा निकाल  १०० टक्यांपर्यंत गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र हे होण्यास नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भरमसाट तोंडी परीक्षेस देण्यात येणारे मार्क कारणीभूत असल्याच दिसून येत आहे. त्यामुळे आता नववी आणि दहावीच्या भाषा विषयाची तोंडी परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाषा विषयांसाठीची 20 मार्कांची तोंडी आणि 80 मार्कांची लेखी परीक्षा हा नियम बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरूवारी जाहीर केला आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची 100 मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे.दरम्यान, हे बदल यंदा फक्त नववीसाठी असून याची दक्षता शाळांनी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाचा हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठी लागू होणार आहे.