पोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध

dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा : उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची असते. १८ वर्षे वयोगटातील युवकांना कायम स्वरूपी शासकीय रोजगार मिळविण्याचा हा एक राजमार्ग आहे. राज्यातील युवक-युवतींसाठी राज्य सरकारतर्फे ही भरती प्रक्रिया राबवली जाते. याच प्रक्रियेमध्ये राज्य सरकारने काही बदल केले आहेत. याअगोदर मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा असायची. मात्र आता राज्यसरकारच्या नवीन नियमानुसार मैदानी चाचणीऐवजी लेखी परीक्षा अगोदर घेतली जाणार आहे.एका जागेसाठी पंधराऐवजी आता फक्त पाच जण या प्रमाणातच उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले जाणार आहे.

दरम्यान,शासनाने अचानक बदललेल्या निकषांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कडाडून विरोध केला जात आहे.पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अनेकांना सामील होता आले पाहिजे, असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.त्यासंदर्भातील व्हिडीओ त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर टाकला आहे. या निकषांत बदल करण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्या ट्वीटला रिट्वीट करत खासदार सुप्रिया सुळेंनीही सरकारच्या नव्या नियमावर टीका केली आहे.

परीक्षेतील सर्व विषयही नेहमीप्रमाणे सारखेच असतील.मैदानी चाचणीची गुणविभागणी पुरुष व महिला संवर्गानुसार खालीलप्रमाणे होते.शारीरिक चाचणी (महिलांसाठी)- धावणे (८०० मीटर) – ३० गुण, धावणे (१०० मीटर) – १० गुण, गोळाफेक –१० गुण, लांब उडी – २५ गुण.शारीरिक चाचणी (पुरुषांसाठी)- धावणे (१६०० मीटर) – ३० गुण., धावणे (१०० मीटर) – १० गुण, गोळाफेक (७.२६० किलो वजन)- १० गुण.मैदानी चाचणीत पूर्वी पुरुष उमेदवारांसाठी पाच, तर महिलांसाठी चार प्रकार होते. आता पुरुषांसाठी लांबउडी, पुलअप्स वगळून केवळ तीन आणि महिलांसाठीही लांब उडी वगळून तीनच प्रकार ठेवण्यात आले आहेत.लेखी परीक्षेत खुल्या गटाला किमान ३५ टक्के, राखीव गटासाठी ३३ टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे.

1 Comment

Click here to post a comment